व्हीडीओ करणे महिला कंडाक्टरला भवलं...

नगर : स्वतःचे व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करणे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिला कंडक्टरला महागात पडले आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या महिला कंडक्टरला एसटी महामंडळाने निलंबित केले आहे. 


मंगल गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये महिला कंडक्टर म्हणून नोकरीस आहेत. त्या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर्स देखील आहेत.

गिरी यांच्या एका व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावरचा त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. अशा व्हिडिओमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचे सांगत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

एवढंच नाही तर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकार्यालाही निलंबित करण्यात आले आहे. या अगोदरही गिरी यांनी अनेकसव्हीडीओ तयार करून एसटी प्रतिमा मलिन केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post