लोणावळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करणाऱ्या कटाची खोटी माहिती देणाऱ्या एकाला लोणावळ्यातून पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव अजय वाघमारे असे आहे. तो मूळचा आटपाडी येथील रहिवासी आहे. लोणावळा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी हा दारूच्या नशेत असताना लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्याने हॉटेलमधून पाण्याची बाटली विकत घेतली. मात्र हॉटेल मालकाने 10 रुपयांची बाटली त्याला 15 रुपयांना दिली.
जास्त किंमत लावणल्याचा राग मनात धरून हॉटेल मॅनेजर व कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा उद्देशाने त्याने पोलिसांना फोन करून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्लॅन चालू आहे, अशी खोटी माहिती अविनाश आप्पा वाघमारे याने पोलिसांनी दिली. त्यामुळे लोणवळा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर कलम 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हा मुंबईत जात असताना तो लोणावळ्यात एका हॉटेलमध्ये थांबला होता. या दरम्यान बिलाच्या वादावरुन त्याने हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना फसविण्यासाठी पोलिसांनी हॉटेलच्या नंबरवरुन कॉल करत खोटी माहिती दिली होती.
Post a Comment