संगमनेर : तालुक्यातील तळेगाव दिघे येथील खोकराळे वस्ती या ठिकाणी एका पोलिस महिलेने माहेरी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
लता गोरख खोकराळे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या पोलिस महिलेचे नाव आहे. मंगळवार १८ ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी लता गोरख खोकराळे (वय २९ ) विवाहित महिला शिर्डी पोलीस ठाण्यात नियुक्तीला होत्या. सध्या त्या रजेवर होत्या. तळेगाव दिघे येथे माहेरी आई-वडिलांकडे राहत होत्या.
दरम्यान मंगळवारी (ता. १८) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरात कुणीही नव्हते. पोलिस असलेल्या लता खोकराळे यांनी पत्र्याच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

Post a Comment