मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे 10-12 आमदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. संपर्कात असलेल्या या आमदारांचा योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य उदय सामंत यांनी केला आहे.
याआधी 14 ऑक्टोबरला रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि उदय सामंत यांची भेट झाली होती. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय विश्रामगृहात सामंत आणि तटकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.
यानंतर उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. याआधी मंत्री असलेल्या शंभुराज देसाई यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचे विधान केले होते.
कोण कोण भाजपाच्या संपर्कात आहेत या विषयी तर्कवितर्क लढविले जात आहे. राजकीय क्षेत्रात आमदारांची नावे चर्चेत येत आहेत.

Post a Comment