नगर : शहरातील एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिची छेड काढल्याप्रकरणी एका ३० वर्षीय तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना सोमवारी (ता. 10)ला दुपारी घडली आहे.
एका १५ वर्षीय शाळकरी मुलीला गेल्या काही दिवसांपासून एकजण त्रास देत होता. आरोपी व त्याचा मित्र हे दोघे शाळेतील मुलीसोबत फोनवरून बोलत असत. पीडितेची मैत्रिण देखील त्यांच्यासोबत बोलत होती. यातून पीडित मुलगी व एका ३० वर्षीय मुलाची ओळख झाली.
मात्र, पीडिता त्याच्या सोबत बोलत नव्हती. परंतु, मैत्रिणीने त्याच्याशी बोलत जा काही होत नाही. बोलायला काय लागते,असे म्हणून तिने पीडित मुलीला बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर तो तिच्याशी जवळीक वाढवू लागला. फोनवरून मेसेज पाठवू लागला.
मुलीच्या आई-वडिलांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी संबंधित तरुणाचा शोध घेऊन त्याला समजावण्याचा प्रयत्नही केला. परंतु त्यानंतरही त्याने मुलीला त्रास देणे सुरूच ठेवले. त्यामुळे आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी तरुणाचा शोध घेऊन त्याच्यावर भादंवि कलम ३५४ नुसार कारवाई केली आहे.

Post a Comment