संगमनेर : तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम पुंजा राऊत व त्यांच्यासह इतर दहा ते पंधरा अनोळखी व्यक्तींवर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा घुलेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
सीताराम राऊत यांच्यासह संजय पुंजा राऊत, संतोष लहानु राऊत सर्वजण (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) व इतर दहा ते पंधरा अनोळखी इसमावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीत म्हटले आहे की, अभंग यांच्या मालकीच्या रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांना बसावयास परवानगी दिली त्याचा सीताराम राऊत यांना राग येऊन, वाईट वाटून त्यांनी घुलेवाडी तलाठी कार्यालय येथे संबंधितांचा रस्ता अडवून जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्या घरावर गैर कायद्याचे मंडळी जमवून हल्ला करून घराचे नुकसान केले.
असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी वरील आरोपीविरोधात अनुसूचित जाती जमाती कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने हे करीत आहे.

Post a Comment