एकनाथ खडसे यांचे तब्बल 18 तास आंदोलन....

मुंबई : जळगाव जिल्हा दूध संघात अधिकाऱ्यांच्या पातळीवर कोट्यावधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला. 


याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी खडसे यांनी केली होती. त्यासाठी एकनाथ खडसे यांनी पोलीस ठाण्यात आंदोलन केले. पण त्यांची मागणी मान्य झाली नाही. संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी खडसे यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले होते. 

हे आंदोलन जवळपास 18 तास चाललं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याप्रकरणी मध्यस्थी करत खडसे यांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले. खडसे यांच्या या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने खडसेंच्या विरोधात कठोर पाऊल उचलले. 

राज्य सरकारने खडसेंना देण्यात आलेली वाय प्लस दर्जीची सुरक्षा काढून घेतली. खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे या कारवाईनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

एकनाथ खडसे एवढे महत्त्वाचे आहेत का? त्यांना सुरक्षा कशाला हवी? असे प्रश्न गिरीश महाजन यांनी उपस्थित केले आहेत. गाड्यांचा ताफा, पोलिसांना मागे फिरवून आपण किती व्हीआयपी आहोत, असं खडसे दाखवायचे! आपल्याला पोलीस सुरक्षा मिळावी म्हणून खडसे त्यांच्या सुरक्षा रक्षकांमार्फत धमकीचा फोन करायला लावायचे, असाही दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post