नाशिक : ग्रामपंचायतीने थकीत करोना प्रोत्साहन भत्ता द्यावा, गट प्रवर्तकांना वेतन सुसूत्रीकरणमध्ये समावेश करावे, भाऊबीज भेट लागू करावी, आदी मागण्यांसाठी आशा व गट प्रवर्तक यांचा 3 ऑक्टोबरला नाशिक जिल्हा परिषेदवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना( आयटक) राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी दिली.
देसले म्हणाले की, सकाळी साडे अकरा वाजता बी. डी. भालेकर मैदान, कालिदास कलामंदिर नाशिक येथून सुरुवात मोर्चाला सुरुवात होणार आहे. आशा व गट प्रवर्तकना शासन निर्णय 2020 अन्वये ग्रामपंचायतने करोना काळात आशा व गट प्रवर्तकांची कामाची दखल घेऊन करोना प्रोत्साहन भत्ता आशा व गट प्रवर्तकांना द्यावा.
असे शासन पत्रक असतांना नाशिक जिल्ह्यात अल्प प्रमाणात फक्त अंमलबजावणी होत आहे. त्यात वेगवेगळ्या ग्रामपंचायत 2 - 4 महिन्यांचा भत्ता देऊन पूर्ण भत्ता देण्याचे नाकारत आहे. आजही बहुसंख्य ग्रामपंचायतने करोना प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही.
Post a Comment