अकोल्यातून रोहोकलेप्रणित गुरूमाऊलीला विक्रमी मतांची आघाडी देणार...

अकोले : रावसाहेब रोहोकले यांनी गुरूमाऊलीची स्थापना करताना काही आचारसंहिता घालून दिली होती.त्या आदर्श आचारसंहितेमुळे शिक्षक बँकेचे राजकारण बदलले असून कमीत कमी खर्चात निवडणुकीला सामोरे जाण्याचा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. त्याचप्रमाणे बॅंकेत अनेक सभासद हितासाठी योजना सुरू केल्या.


निवडणुकीतून हॉटेल संस्कृती बंद करण्याचे श्रेय रावसाहेब रोहकलेप्रणित गुरूमाऊलीचे आहे.त्या विश्वासार्हतेच्या बळावर  आणि शिक्षक बँकेत साडेतीन वर्षात केलेल्या भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या जोरावर बॅंकेला आर्थिक शिस्त लावून बॅंक सुस्थितीत आणली. 

उर्वरित इतर सर्वच मंडळांनी कोणतेही तत्व न बाळगता मागील पाच वर्षात एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. परंतु फक्त सत्तेसाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आघाड्या करून कुरघोड्या करण्याचं काम सुरू केले आहे. परंतु सभासद त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.

या निवडणुकीत अकोले तालुका रोहोकलेप्रणित गुरूमाऊलीच्या सर्वच उमेदवारांना विक्रमी मतांची आघाडी मिळवून देणार असल्याचा विश्वास शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष गणपत सहाणे यांनी प्रचार दौ-यावेळी केले. 

यावेळी श्री. अशोक ढगे, श्री.प्रताप आंबरे, श्री. बाळासाहेब शेळके,श्री.जयदेव चौधरी, श्री.सखाराम मेसे, श्री. बाळासाहेब आवारी, श्री. विलास वाकचौरे, श्री.गोरक्षनाथ देशमुख, श्री. गणपत सहाणे, श्री. भाऊसाहेब हासे, श्री. बाळासाहेब बांबळे,श्री. अनिल मोहीते, श्री.गणपत सहाणे श्री. तानाजी वाडेकर, श्री. सुदाम धिंदळे, श्री. राजेंद्र शिंदे,श्री. राजू भा़गरे, श्री. संजय गायकवाड, श्री. भाऊसाहेब कासार, श्री. अनिल पवार, श्री. विजय गोर्डे , श्री. संजय भोर, श्री.डी.डी‌ वाकचौरे,श्री. किसन दराने, श्री. सुरेश वाकचौरे, श्री.गवराम गजे, श्री. राजु थोरात , श्री. पी. एस. शिंदे, श्री. किरण फापाळे, श्री. ज्ञानेश्वर जोर्वेकर, बी.एस.शेळके, श्री. दत्तात्रय शेळके, श्री.बबन रणपिसे, श्री. संतोष फटांगरे ,श्री. तुकाराम आवारी, श्री. भिमाशंकर हांडे, श्री. संजय देशमुख, श्रीमती. सविता भरीतकर, श्रीमती. देशमुख मॅडम, श्रीमती. रेखा कांबळे यांनी विविध शाळांना भेटी दिल्या.  

प्रचार दौ-या निमित्ताने  शाळाशाळांवर सभासदांचा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद  मिळत असून सभासदांमध्ये सुप्त लाट असून रोहोकलेप्रणित गुरूमाऊली मंडळाने दिलेले सर्वच उमेदवार अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे असल्यामुळे मंडळ मोठ्या मत्ताधिक्याने विजयी होईल असा विश्वास माधव हासे यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post