माजी खासदार चंद्रकांत खैरे अडचणीत...


मुंबई ः
 
औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चंद्रकांत खैरेंविरोधात शिंदे गटातील महिला आघाडीकडून पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.  खैरे म्हणाले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेे यांचा मला भयंकर राग आला आहे. या रिक्षावाल्याने इकते पैसे कुठून कमावले? शिंदेंनी शिवसेना फोडण्याचे काम केले. 

आनंद दिघे असते तर गद्दारी केल्यामुळे त्यांना उलटा टांगला असता. आनंद दिघेंच्या नावावर हे सगळं करतोय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा भविष्यात विजय होणार आहे. ज्यांनी गद्दारी केली ते संपले', असे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले होते. 

त्यानंतर शिंदे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. रविवारी औरंगाबादेत शिंदे गटातर्फे खैरे यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला.

दरम्यान, औरंगाबाद, सातारा, पाठोपाठ आता पुण्यातही शिंदे गटातील महिला आघाडीकडून खैरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यात उत्तम नगर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्यांमुळे भावना दुखावल्याचा उल्लेख सुद्धा या तक्रारीत करण्यात आला आहे.​​

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post