आमदार बच्चू कडू व राणा दाम्प्त्यात वाद... एका बापाची अवलात असले राणा यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावे....

अमरावती ः दिवाळीच्या तोंडावर अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि खासदार रवी राणा व आमदार रवी राणा यांच्यामध्ये वाद पेटला आहे. हा वाद विकोला गेला तर आमदार बच्चू कडू शिंदे-फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वादावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


महाठग खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे असे राणा दाम्पत्य आहे' अशी टीका कडू यांनी केली होती. त्यानंतर राणा यांचे समर्थक बच्चू कडू यांच्या गावात दिवाळीचा किराणा घेऊन पोहोचले होते. यामुळे प्रहारचे कार्यकर्ते संतापले होते. एका बापाची अवलाद असेल तर रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावे असं आव्हान आमदार बच्चू कडू यांनी राणा यांना दिले आहे.

आमदार बच्चू कडू आणि खासदार व आमदार राणा दाम्पत्य यांच्यातील वाद विकोपाला पोहचल्याचे दिसत आहे. माझ्या विरुद्ध गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. तो त्यांनी सिद्ध करावा सिद्ध झाला तर रवी राणा यांच्या घरी भांडी घासेल, नाहीतर त्याला कायमचा हिजडा घोषित करू, अशी आक्षेपार्ह टीका प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी केली आहे. याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मी जर गुवाहाटीला जाऊन पैसे घेतले असेल तर ते कोणी दिले असेल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांनी सुद्धा स्पष्ट करावं मी यांना सुद्धा नोटीस पाठवणार आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून तुम्ही मंत्रीपदासाठी रांगेत उभे राहिले. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून तुम्ही बदनामी करायची, माझी लढाई शांततेची आहे. पण, जास्त अंगावर आली तर आरपारची लढाई लढू. जिथे म्हणाल तिथे एकटा जाण्याची तयारी आहे बच्चू कडू स्वतःच्या भरोशावर निवडून आलेला आहे, कोणाच्या पाठिंब्यावर नाही, असा टोलाही बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post