शेतकऱ्यांना 50 हजाराची नुकसान भरपाई द्या....

औरंगाबाद ः पंचनामे कधी करणार, तोपर्यंत शेतकऱ्यांचे हाल होऊन जातात. पंचनामे होईल, तेव्हा होईल. पण ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत मिळालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे.


अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादेत पोहोचले. दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची त्यांनी पाहणी केली.  यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

ठाकरे म्हणाले की, एका बाजूला दिवाळी सुरू आहे, आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा दिवाळं निघाले आहे. कपडे काय घालायचे असे प्रश्न सर्वांना पडले आहे, पण शेतकऱ्याच्या घरी भक्कास असे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात प्रचंड पाऊस झाला. पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही, असे उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. 

त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तर असतात. आज ते म्हणतील, संपूर्ण चिखल झाला आहे, पाणी झाले. पण ग्रामीण भागामध्ये किती पाऊस पडावा, हे सरकारच्या हातात नसते, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येत असते. अशावेळी शेतकऱ्यांना उघड्यावर पडू द्यायचे नसते. आता नुसती घोषणाची अतिवृष्टी सुरू आहे.  या सरकारकडे भावनाचा दुष्काळ आहे. कृषिमंत्री आले नाही, मुख्यमंत्री आले नाही. हे उत्सवी सरकार आहे, उत्सवमग्न सरकार आहे. 

फक्त उत्सव साजरे करत आहे. मी उत्सव साजरे करा असे म्हणत नाही. पण उत्सव साजरे करत असताना आपल्या राज्यातील जनता समाधानी आहे की नाही, हे पाहण्याचे काम सरकारचे आहे. हे सरकार अपयशी ठरत आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली.

जर हे सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती नाही, असे हे सरकार म्हणतंय म्हणून प्रतिकात्मक ही भेट आहे. खरंकाय आणि खोटं काय हे सरकारला कळू द्या. रेशन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. जो शिधा सरकार वाटत आहे, ते धान्य हे शेतकऱ्यांकडूनच आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे, 50 हजार हेक्टरी मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

उध्दव ठाकरे यांनी शेतकर्यांच्या नुकसानीची पहाणी करून सरकारवर आरोप केलेले आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी आरोप केलेले आहेत.  आता त्यांच्या आरोपाला कसे प्रतिउत्तर मिळते, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post