पारनेर : बँकेमध्ये मागील संचालक मंडळाने आदर्शवत व पारदर्शक कारभार केल्यामुळे या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा गुरुमाऊली मंडळ 2015,ऐक्य मंडळ, शिक्षक भारती व एकल मंच या आघाडीच्या उमेदवारांना सभासदांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे, असे प्रतिपादन या आघाडीचे नेतृत्व करणारे शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी केले.
पारनेर येथे आयोजित शिक्षक बँक नूतन संचालक व विकास मंडळ विश्वस्त पदग्रहण कार्यक्रम प्रसंगी उद्गार काढले. यावेळी माजी केंद्रप्रमुख बाबासाहेब भोर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमप्रसंगी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष गोकुळ कळमकर, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनाप, माजी चेअरमन शरदभाऊ सुद्रिक, शिक्षक संघाचे राज्य प्रतिनिधी आबासाहेब दळवी, शिक्षक बँकेचे व्हा.चेअरमन सुयोग पवार, शिक्षक नेते आर. टी. साबळे, ऐक्य मंडळाचे नेते बाळासाहेब कदम, नवनिर्वाचित संचालक संदीप मोटे, महेश भणभणे, बाळासाहेब तापकीर, कारभारी बाबर, सूर्यकांत काळे, विकास मंडळाचे विश्वस्त राजेंद्र निमसे, संतोष मगर, मुकुंदराज सातपुते, प्रल्हाद भालेकर, गणेश गायकवाड, जामखेड शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चव्हाण, ऐक्य मंडळाचे सरचिटणीस सुरेश नवले, गुरुमाऊली मंडळाचे तालुकाध्यक्ष सुरेश निवडूंगे, अखिल शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण चेमटे, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष कैलास लेंभे, श्रीगोंदा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष अरविंद शिर्के, शिक्षक नेते अजय लगड, संजय ओहोळ, प्रमोद शिर्के, अनिल इकडे, सुनील वाखारे, महिला आघाडीच्या छाया मापारी, कांताताई बनकर, छाया मगर यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिक्षक बँकेच्या पारनेर शाखेमध्ये शिक्षक बँकेचे नूतन संचालक कारभारी बाबर व सूर्यकांत काळे तसेच विकास मंडळाचे नूतन विश्वस्त प्रल्हाद भालेकर यांचा पदग्रहण सोहळा पारनेर शाखेमध्ये संपन्न झाला.
बापूसाहेब तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की बँकेत मागील संचालक मंडळाच्या पारदर्शक आदर्शवत कारभाराने जिल्ह्यातील सभासदांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे निवडणुकीमध्ये सभासदांनी आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरभरून मतांचे माप दिले.
त्याचाच परिणाम म्हणून पुन्हा एकदा आघाडीची सत्ता बँकेमध्ये आली आहे. यामुळे या नूतन संचालक मंडळाची जबाबदारी वाढली असून तसेच सभासदांच्याही चांगल्या कारभाराबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हे संचालक मंडळ सुद्धा चांगलाच कारभार करेल याबाबत सभासदांनी कुठलीही काळजी करू नये, असे बापूसाहेब तांबे यांनी सांगितले.
विकास मंडळाच्या जागेत गुरुजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी सर्वांना बरोबर घेऊन केली जाईल. तसेच संघटनात्मक कामाबद्दलही एकजुटीने लढा दिला जाईल, असे तांबे यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले.
यावेळी माजी चेअरमन व जिल्हा संघाचे कार्यकारी अध्यक्ष गोकुळ कळमकर,माजी चेअरमन साहेबराव अनाप,नवनिर्वाचित संचालक कारभारी बाबर,सूर्यकांत काळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास उपस्थित सर्व शिक्षक बँकेचे नवनिर्वाचित संचालक व विकास मंडळाचे विश्वस्त यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नेते प्रकाश नांगरे केले. स्वागत जिल्हा संघाचे उपाध्यक्ष गौतम साळवे यांनी केले. प्रास्ताविक राज्य संघ प्रतिनिधी आबासाहेब दळवी तर आभार विकास मंडळाचे विश्वस्त प्रल्हाद भालेकर यांनी मानले. कार्यक्रमास मोठया संख्येने शिक्षक सभासद उपस्थित होते.सर्व उपस्थितांना यावेळी दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment