एम. व्ही. देशमुख
नगर
ः राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत.
भाजपाकडून आगामी विधानसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी राजकीय खेळी
चालू असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्या माजी आमदाराने आपल्याला शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांमध्ये त्यांना काही अंशी यशही आले होते. मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेत कोणाकडून उमेवारी न करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या उतरण्याची माजी आमदार महोदयांनी तयारी सुरु केलेली आहे.
सध्या ते मतदार संघातील
कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरवात झालेली आहे. निवडणूक लांब असली तरी
आतापासून मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यास त्या माजी आमदार महोदयांनी
सुरवात केलेली आहे. ते खेळत असलेल्य राजकीय खेळीत यशस्वी होतात, की अपयशी
ठरतात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
पक्षाकडून
आपल्याला आगामी काळात उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत दिसून येत आहेत.
त्यामुळेच माजी आमदारांनी इतर पक्षांशी संपर्क साधू उमेदवारी मिळण्याचा
प्रयत्न सुरु केलेला आहे. त्यांच्या प्रयत्नांना किती यश येते हे आगामी
काळात स्पष्ट होणार आहे. मात्र त्या आमदारांच्या सुरु झालेल्या राजकीय
हालचाली मात्र चर्चेला विषय ठरत आहे.
राष्ट्रवादीतून मागील निवडणुकीत
शिवसेनेत जाण्याची हालचाल केली होती. त्यावर निर्णय होणार होता. मात्र
शिवसेनेत फूट पडल्यामुळे आता राष्ट्रवादीतून थेट भाजपात जाण्याचा निर्णय
त्या माजी आमदार महोदयांनी केलेला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे
राष्ट्रवादीला जिल्ह्यात खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment