अमर छत्तीसे
श्रीगोंदा : महाविकास आघाडीने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून ५०हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय शिंदे -फडणवीस सरकारने अंमलात आणला. परंतु अहमदनगर जिल्हा बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना दिवाळीला गाजरच दाखवण्याचा प्रकार होणार असल्याची चर्चा सुरु आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या एकूण सभासद व इतर बँका यांच्या नियमित कर्जभरणा करणाऱ्या ६०९३ शेतकरी महात्मा फुले कर्जमाफी योजनेत पात्र झाले आहेत.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतून येणारी यादीत अतिशय ढिसाळ कारभार चालत असल्यामुळे आतापर्यन्त ५७१ शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आली आहे पण मोठा गवगवा करून दिवाळीला शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असे सांगण्यात आले होते .
या कारभारामुळे शेतकऱ्याना दिवाळीला गाजर दाखवण्याचा प्रकार होणार हे निश्चित.आतापर्यंत श्रीगोंदा तालुक्यात फक्त ५७१ शेतकर्यांची यादी आधार प्रमाणिकरण करण्यासाठी आलेली आहे पण इतर शेतकरी दुसऱ्या यादीकडे डोळे लावून बसले आहेत.
राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्याना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुमारे २५०० कोटी रुपये संबधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पण श्रीगोंद्यातील शेतकरी मात्र दिवाळीच्या तोंडावर वंचित राहणार आहे.
कारण अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचा संथगतीचा कारभार कारणीभूत आहे . त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर श्रीगोंद्यातील कर्जमाफी पात्र शेतकरी वंचित राहिले आहेत . त्यामुळे बँकेच्या या कारभारा बाबत नाराजी व्यक्त होत.

Post a Comment