साहेब पाहणी नको मदत द्या.... नुकसानग्रस्त शेतकर्यांची सरकारला आर्त हाक...

 अमर छत्तीसे

श्रीगोंदा : ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाने कहर केला व हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी वर्गाची ही दिवाळी अंधकारमय झाली आहे. त्यामुळे "साहेब आता पाहणी नको" मदत द्या, अशी आर्त हाक शेतकरी शासनाला घालत आहेत. 


गेल्या महिनाभरापासून अगदी वसुबारसेपर्यंत मुसळधार पावसाने थैमान घातले होते. काढणीला आलेल्या उडीद, मका, बाजरी पिके अक्षरक्षः पाण्यात न्हाऊन निघाली. निसर्गाच्या प्रकोपाणे हातातोंडाशी आलेला घास गेला. 

उडीद,  मका, विकून चार पैसे मिळवून दिवाळी साजरी करण्याचे पाहिलेल्या स्वप्नावर पाणी फिरले. त्यामुळे दिवाळी लख्ख प्रकाशात साजरी होण्याऐवजी अंधकारमय साजरी करण्याची वेळ शेतकरी राजावर आली.

गेल्या तीन चार दिवसांपासून विरोधी पक्षाचे नेतेमंडळी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून सरसकट पंचनामे करावेत, एकरी ५० हजार रूपये मदतीची सरकारकडे मागणी करु लागले आहेत. 

सत्ताधारी ही बांधावर जाऊन पाहणी करून पोकळ आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकरी वर्गाला फक्त आधाराची गरज नाही तर ठोस अशा मदतीची गरज आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे न करता मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे. 

एकंदरीत सगळ्या बांधावरील पाहणी व आधाराला शेतकरी वैतागले असून "साहेब पाहणी नको मदत द्या" अशी आर्त हाक सरकारला देऊ लागले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post