ऐन दिवाळीत राज्याचे महसूल मंत्री शेतकऱ्यांच्या शेतावर....


निघोज : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी राज्य सरकार जलदगतीने निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. 


मंगळवार दुपारी दोन वाजता अळकुटी, दुपारी तीन वाजता निघोज व चार वाजता जवळा या पारनेर तालुक्यातील तीन गावांचा दौरा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांत सुधाकर भोसले, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप,कृषी अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, राहुल शिंदे,  राळेगण थेरपाळ सरपंच पंकज कारखिले, पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. भास्कर शिरोळे, भाजपचे तालुका अध्यक्ष वसंत चेडे, विश्वनाथ कोरडे,  ज्येष्ठ नेते शिवाजीराव  सालके, बाळासाहेब पठारे, मुंबई बॅंकेचे अधिकारी सुनील पवार, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, प्रेस फोटोग्राफर जयसिंग हरेल, अमोल सालके, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे, आर के वराळ, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, भाजपचे सांस्कृतिक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव हारदे,मेजर विकास वराळ, सुनिल वराळ पाटील, रवी रणसिंग, रोहित पठारे, तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन,माजी चेअरमन  कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करीत मार्गदर्शन केले. यावेळी विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शेतकऱ्यांना आश्वासीत करताना त्यांनी सांगितले की पारनेर तालुक्यात निघोज, आळकुटी,जवळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने कांदा, सोयाबीन,फळफळांवर यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.

पंचनामे बहुतांश ठिकाणी करण्यात आली आहेत. हा पाउस दिवाळीत झाल्याने अधिकाऱ्यांनी सुट्टी न घेता जाग्यावर जाउन पंचनामे केले आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. 


यावेळी  निघोज येथे संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी माहिती देताना सांगितले की आळकुटी, जवळा,  मोरवाडी, रसाळवाडी, कोल्हेवाडी, शिरसुले, वडगाव, वडनेर,  पठारवाडी, गुणोरे, गाडीलगाव तसेच कुंड व परिसरात मोठ्या पाऊसाने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्या आहेत. कांदा चाळी वाहून गेल्या आहेत. 

सोयाबीनचे ढिग शेतकऱ्यांनी शेतात उभे केले होते. ते वाहून गेले आहेत. मोठ्या पाउसाने जनावरांचा हिरवा चारा नष्ट झाला आहे. कांद्याच्या रोपांची नुकसान झाली आहे. रस्ते,पुल वाहून गेले आहेत. बहुतांश परिसरात अधिकाऱ्यांनी पंचनामे केले आहेत. 

मात्र राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तातडीने देण्याची गरज असल्याची मागणी वराळ पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

वराळ यांच्या निवेदनाची दखल तातडीने घेत जिल्हाधिकारी भोसले यांच्याशी चर्चा करीत वराळ यांना शेतकऱ्यांना न्याय देण्याची तरतूद राज्य सरकार करणार असल्याची ग्वाही नामदार विखे पाटील यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post