आमदाराला वादग्रस्त वक्तव्य भवलं....

मुंबई ः एका आमदाराला तीन वर्षांपूर्वी केलेले वादग्रस्त वक्तव्य चांगलंच महागात पडले आहे. न्यायालयाने या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात आमदाराला दोषी ठरवत तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 


25 हजार रुपयेही दंड भरावा लागलाय. सोबतच आमदाराकी गमावण्याची टांगती तलवार आहे. दरम्यान या आमदाराला जामीन मिळू शकतो.  त्यामुळे जामीन मिळवण्यासाठी या आमदाराकडे एक महिन्यांचा कालावधी असणार आहे. 

समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेता व रामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आजम खान यांना एमपी-एमएलए न्यायालयाने  हेट स्पीच प्रकरणी गुरुवारी ही शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने खान यांना 125, 505 आणि 153 ए नुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे. भाजप नेता आकाश सक्सेना यांनी 27 जुलै 2019 रोजी आजम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.  

रामपूरमधील मिलक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषणाद्ववारे जनतेला संबोधित केलं. खान यांनी या भाषणादरम्यान  पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि तत्कालीन डीएम यांच्यावर टीका करताना आपत्तीजनक भाषा वापरल्याचा आरोप सक्सेना यांनी केला होता. दरम्यान आता 3 वर्षानंतर खान यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेमुळे आात इतरांनाही भाषण करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post