नेप्तीत कांद्याला एव्हढाच भाव

नगर ःदादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत कांद्याला 2900 रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नेप्ती उपबाजार समितीत कांद्याच्या 47हजार 712 कांदा  गोण्यांची आवक झाली होती. त्यामध्ये कांद्याला सुमारे 2900 रुपयांचा भाव मिळाला आहे.  


कांद्याचे  प्रतवारीनुसार भाव - एक नंबर कांदा ः 2300 ते 2900, दोन नंबर कांदा ः 1600 ते 2300, तीन नंबर कांदा ः 800 ते 1600, चार नंबर कांदा ः 200 ते 800. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करूनच तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

कांद्याला सध्या भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस आणू नये. कांद्याची आवक वाढल्यास कांद्याच्या भावात घसरण होण्याची दाट शक्यता आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post