मंत्री सत्तार म्हणतात दारु पिता का...

बीड ः पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी सत्तार यांनी चहा पिता पिता तुम्ही दारू पिता का, असा अजब सवाल जिल्हाधिकाऱ्यांना केला. त्यामुळे आता सत्तरांच्या व्हिडीओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अब्दुल सत्तार, अर्जून खोतकर व काही अधिकारी चहा पिण्यासाठी बसले असताना व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.


बोलणं सुरू असताना मी चहा कमी पितो, असं जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी म्हटले. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी अचानक दारू पिता का?, असा सवाल विचारला. कोणालाही प्रश्न अनपेक्षित नव्हता, त्यामुळे उपस्थितीतांमध्ये एकच हशा पिकल्याचे दिसून आले. मात्र, त्यावेळी कॅमेरा सुरू होता, हे सत्तारांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर त्यांनी कॅमेरा बंद करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, जोरदार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी परिस्थिती नाही, असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आणखीच नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या त्यांच्या वक्त्याव्यामुळे शिंदे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post