अमर छत्तीसे
नगर ः आगामी लोकसभा निवडणुकीतील नगर जिल्ह्यातील दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लढत काट्याची टक्कर होणार असल्याची चर्चा आतापासून सुरु झालेली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नसला तरी सध्याचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांना धास्ती आतापासून उभी राहिली असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरु झालेली आहे. त्यामुळे आगामी लढत चुरशीची होईल, हे आता स्पष्ट झालेले आहे.
लोकसभेची निवडणुकीला अद्याप अवधी असला तरी नगर जिल्ह्यात मात्र आतापासून लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे. काहीजणांना तर आपलेल्याच उमेदवारी आगामी निवडणुकीत मिळेल, अशी खात्री झालेली असून ते तसे वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे आगामी लढत कशी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सध्या भाजपाकडून खासदार म्हणून डाॅ. सुजय विखे कार्यरत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांना उमेदवारी पक्षाकडून दिली जाते की ऐन वेळी दुसरा कोणी उमेदवार उभा केला जातो, हे स्पष्ट झालेले नाही. असे असतानाही डाॅ. सुजय विखे आगामी निवडणुकीत आपणच विजयी होईल, असे वक्तव्य करीत असून आपल्या समोरचा उमेदवार कोण असेल व तो पराभूत होईल, असे जाहीर भाषणात बोलत आहेत.
मात्र आगामी निवडणुकीत भाजप कोणाला उमेदवारी देणार आहे, हे स्पष्ट झालेले नाही. तोच विखे स्वतः उमेदवारी मिळेल, अशी खात्री आता कशी देऊ शकतात, असा सवाल आता भाजप कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. परंतु तो जाहीर आता होणार नाही. मध्यंतरी आमदर निलेश लंके यांचे नाव चर्चेत आले होते. परंतु आमदार लंके यांनी आपण लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केलेले आहे. तरीही विखे यांच्याकडून त्यांचे नाव घेऊन आपला विजय पक्का असल्याचे सांगत आहेत.
मात्र मतदार मतदान करत असतात. उमेदवार यांनी ठरवून कोणी विजयी होत नसते. त्यामुळे विखे यांनी हवेत वलगना करण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रीत करावे, असा सल्ला राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांमधून दिला जात आहे.
Post a Comment