नागपूर : नोव्हेंबर महिन्यात समृद्धी महामार्ग हा शिर्डीपर्यंत खुला होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहे. नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी शिंदे यांनी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाबद्दल माहिती दिली.
समृद्धी महामार्ग आपण लवकरच मोकळा करणार आहोत. शिर्डीपर्यंत प्रवासाला परवानगी दिली जाणार आहे. त्यानंतर शिर्डी ते नागपूर दुसऱ्या टप्प्यात मोकळा केली जाईल. नोव्हेंबर महिन्यातच शिर्डीपर्यंत प्रवासासाठी मोकळा केला जाईल, अशी घोषणाही शिंदे यांनी केली.
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम आता पूर्ण होत आले आहे. पण हा महामार्ग कधी सुरू होणार याची प्रतिक्षा अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेला लागली आहे. ती आता पू्ण होणार आहे.

Post a Comment