मुंबई : इंटरनेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. जगभरात प्रसिद्ध असलेले व्हॉटअँपची सेवा ठप्प झाली आहे. युजर्सना व्हॉटसअँप सेवेचा लाभ घेता येत नाहीत. कोणतेही मेसेज जात नसल्याचं युजर्सचे म्हणणे आहे. त्यामुळे संवाद साधण्यात अनेक अडथळे येत आहेत.
आज व्हटॉटअँपची सेवा सुमारे पाऊण तासापासून ठप्प झाली होती. व्हॉट्सअँपकडून सेवा ठप्प का झाली याचे कारण अद्याप देण्यात आले नाही. याआधी देखील व्हॉटसअँपची सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे युजर्सला मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अनेक ऑफिसमधील कामे देखील व्हॉटअँपवर होत असतात. त्यामुळे ही कामही खोळंबली आहेत. व्हॉटसअँपची सेवा कशामुळे खोळंबली? ती कधी पूर्ववत होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. युजर्सला अजून किती प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे ट्वीट करून अनेक जण विचारत आहेत.
ही सेवा ठप्प झाल्याने अनेकांना अस्वस्थ वाटत होते. काहींनी तर एकमेकांना दूरध्वनी करून व्ह़ॉटसअप चालू आहे का याची खात्री केली. काहींनी वारंवार आपला मोबाईल रिस्टार्ट करून पाहिला. पण व्हॉटसअप बंद असल्याचे लक्षात आले.

Post a Comment