अजित पवार व सुप्रिया सुळे यांना नोटीस पाठवणार....

मुंबई : अब्दुल सत्तार यांच्या या वादानंतरल एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेनाही आक्रमक झाली आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे तसंच आदित्य ठाकरे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार असल्याचा इशारा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी दिला आहे.


कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त केले आहे. सत्तार यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. 

पक्षाकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली.


सुप्रिया सुळे यांच्याकडे काय पुरावे आहेत, हे त्यांनी सांगावं. अजित पवार जेव्हा पहाटे शपथविधीला गेले तेव्हा किती खोके त्यांना मिळाले होते, हे त्यांनी सांगावं. 4 महिने जनतेच्या समस्या बाजूला ठेवून जे राजकारण होत आहे, त्या अॅक्शनला ती रिअक्शन होती. सत्तार यांची जीभ घसरली तर एवढा उहापोह का?, असा सवाल विजय शिवतारे यांनी उपस्थित केला आहे.

अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याबाबत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली. तसंच एकनाथ शिंदेंनी सत्तार यांना माफी मागण्याचे आदेश दिले. यानंतर अब्दुल सत्तार यांनी माफीही मागितली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post