सुप्रिया सुळे यांच्यावरील टिका... आदित्य ठाकरे यांनी घेतला सत्तार यांचा भाषणातून टीका....

सिल्लोड : मी ज्या मतदारसंघात आलो आहे तिथल्या गद्दाराच्या मनात घाण आहे. घाणेरडं राजकारण सुरू आहे. गलिच्छ राजकारण सुरू आहे. शिवीगाळ करत आहेत. सुप्रियाताईंना जे बोलले ते बोलू नका, ते बोलण्यासारखे नाही. 


हा सत्तेचा माज आहे. सत्तार यांच्या मनात काळं आहे. मंत्री होताच सत्तेची मस्ती चढली. टीईटी घोटाळा केला, शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झाला,' अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात आले होते. सिल्लोडमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला. अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सत्तार यांच्या या वक्तव्याचाही आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला.


ओला दुष्काळ कुठे आहे, हे त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. एक रुपयासुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नाही. खोके सरकारचे कृषीमंत्री आहेत. प्राथमिक सर्व्हे झाले का? मतदारसंघात फिरले का? पुणे-नाशिकमध्ये कोण कृषीमंत्री आहे हेच माहिती नाही. मला छोटा पप्पू म्हणता, मी स्वीकारतो, पण शेतकऱ्यांना मदत करा, मग मी पप्पू नाव स्वीकारतो,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post