वाचाळवीरांना आवरा...

मुंबई :  विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हेसुद्धा राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर भडकले आहेत. तसेच त्यांनी यासंबंधी सरकारला आवाहन केले आहे.


राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम वादात सापडतात. छत्रपती शिवाजी महाराजांसदर्भात त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टिका होत आहे. 

यानंतर राजकीय पक्षांसह काही संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. गटनेत्यांची बैठक बोलावली होती. सर्व जण हजर होते. अधिवेशनामध्ये कोणते विषय घ्यावे, यावर चर्चा झाली. 

आजची कामकाज सल्लागार बैठक पुढे ढकलली आहे. ती आता 5 डिसेंबरला होणार आहे. 5 दिवस काम आणि बाकीचे सर्व दिवस अशासकीय कामे दिले आहे. आम्ही सरकार सोबत बसुन अधिवेशनावर चर्चा करू. 

तसेच विदर्भातील प्रश्नाला मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जावे, असेही ते म्हणाले. तसेच 19 डिसेंबर रोजी महाविकास आघाडी बैठक होणार आहे, अशी माहितीही त्यानी दिली.

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर वाचाळवीरांना आवरा, असे आवाहन अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केले आहे. तसेच त्यांनी जबाबदारीने बोलावे. युगपुरुष शिवाजी महाराज यांची तुलना करता येत नाही, असेही अजित पवार म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post