सातारा : भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलाना छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले त्या घटनेशी केल्याने नवा वाद पेटला आहे. लोढा यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून जोरदार टीका केली आहे.
प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळ्यात ते बोलत होते. लोढा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होते. पण, शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले.
एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून बाहेर पडले, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे
Post a Comment