नगर - अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्ज व्याजदरात 0.20 टक्के दराने कपात करण्याचा आदेश सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाचे शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी संचालक मंडळाला दिला.
जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षकांची आम सभा आयोजित केली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे होते. या आमसभेला महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष विद्याताई आढाव, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन गोकुळ कळमकर, साहेबराव अनाप, उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव फुंदे ,बाबासाहेब खरात ,सुयोग पवार, मच्छिंद्र लोखंडे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष डॉ. संदीप मोटे, उपाध्यक्ष कैलास सारोक्ते, विकास मंडळाचे अध्यक्ष विलासराव गवळी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अंजली मुळे, मीनाक्षी अवचरे, वनिता सुंबे, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, सरचिटणीस शरद वांडेकर, परिवर्तन मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र विधाते, अनिल टकले, विजय नरवडे संचालक श्री अण्णासाहेब अभाळे, भाऊराव राहींज, शशिकांत जेजुरकर, योगेश वाघमारे, बाळासाहेब सरोदे ,गोरक्षनाथ विटनोर, रामेश्वर चोपडे, रमेश गोरे, ज्ञानेश्वर शिरसाट, कल्याण लवांडे, महेश भनभणे ,संतोष राऊत, बाळासाहेब तापकीर, सूर्यकांत काळे, कारभारी बाबर, सरस्वती घुले, विकास मंडळाचे सचिव संतोष मगर, संतोष आंबेकर, प्रल्हाद भालेकर, मुकुंद सातपुते, नवनाथ दिवटे ,राजेंद्र निमसे,आदी मान्यवर उपस्थित होते.
या आमसभेत रविकिरण साळवे, पांडुरंग मोहोळकर, योगेश खेडकर, ज्ञानेश्वर गर्जे, विजय नरवडे, राहुल खराडे, संजय पवार,गौतम साळवे, हिरामण गुंड,शरद वांडेकर , कैलास सहाने,सतीश जाधव, ना. चि. शिंदे यासह अनेक कार्यकर्त्यांनी सर्वसाधारण सभेच्या दिवशी आपण दिलेल्या 0.20 टक्के व्याजदर कपातीच्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी केली. जिल्ह्यातील गुरुमाऊली मंडळ व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली.
बापूसाहेब तांबे यांनी गुरुमाऊली मंडळ जो शब्द देते, तो तंतोतंत पाळते. आम्ही जे बोलतो, ते करून दाखवतो आणि म्हणूनच जिल्ह्यातील तमाम प्राथमिक शिक्षकांनी गुरुमाऊली मंडळ व आघाडीला प्रचंड मतांनी विजयी केले आहे .याची जाणीव आम्हास आहे. आम्ही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणार व सर्वसामान्य सभासदांनी ठेवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही ,असाच कारभार करणार आहे. भविष्यकाळात या ठिकाणी केला जाईल असे आश्वासित केले.
कर्जाचा व्याजदर यापुढे साडेआठ टक्के व शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह बांधणी कर्ज या कर्जाचा व्याजदर आठ टक्के करावा असे संचालक मंडळाला आदेशित केले. यामुळे जिल्ह्यातील कर्जदार सभासदांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. एकीकडे रेपो रेट वाढत असताना, मुदत ठेवीचे व्याजदर वाढत असतानाही शिक्षक बँकेने धाडसाने व्याजदर कपातीचा निर्णय घेतल्याबद्दल सर्वसामान्य सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी अध्यक्षपदाहून बोलताना श्री राजकुमार साळवे यांनी कर्जाचा व्याजदर सत्ताधारी मंडळ वाढविणार आहे, असा डांगोरा जिल्ह्यातील विरोधकांनी गेल्या सात आठ दिवसापासून व्हाट्सअप च्या माध्यमातून पेटवला. परंतु असा सभासद अहिताचा निर्णय कधी घेणार नाही. यापूर्वी जी आश्वासन गुरुमाऊली मंडळाने दिली, ती सर्व आश्वासने पाळली आहेत. यापुढे त्याचीच पुनरावृत्ती होईल, असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी जिल्ह्यातून तालुकाध्यक्ष विठ्ठल काळे प्रवीण पटेकर, दादासाहेब रोहोकले, सुनील घोगरे, महादेव गरजे, किसन कोकाटे, विकास बगाडे ,माजिद शेख, विश्वनाथ कदम, सुनील शिंदे, अविनाश बचाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment