पारनेर : तालुक्यातील जवळा येथे शनिवार दि 27 नोव्हेंबर रोजी गव्हाळी शिवारात जवळा शिरूर महामार्गा लगत असलेल्या शेतातील उभ्या उसाला दुपारी अचानक आग लागून सुमारे 35 एकर ऊस जळून बेचिराख झाल्याची घटना घडल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तोडणीस आलेल्या उसाला आग लागून डोळ्यासमोर होत्याचे नव्हते, झाल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या ऊस क्षेत्रावरुन विद्युत वाहक तारा यांचे जाळे पसरलेले आहे. खांब ही रेललेले आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन ठिंणगी पडून उसाने पेट घेतला. तशा उसातून आगीच्या ज्वाळासह लोटच्या लोट बाहेर पडू लागले.
या परिसरातील शेतकरी व रस्त्यावरून जाणारे येणारे नागरिक मदतीसाठी व आग विझविण्यासाठी धावून आले. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने कुणाचेही काहीच चालले नाही. जे सी बी यंत्राने जाळपट्टे तातडीने तयार करण्यात आले परंतु आगीची दाहकता व वारा यामुळे लोट थांबले नाहीत. यात सुमारे तीस ते पस्तीस एकर ऊस जळून खाक झाला.
Post a Comment