शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी संदीप मोटे व उपाध्यक्षपदी कैलास सारोक्ते

नगर ः जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी संदीप मोटे व उपाध्यक्षपदी कैलास सारोक्ते यांची  निवड झाली. 


जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी चौरंगी लढत झाली. यामध्ये बापुसाहेब तांबे यांच्या गुरुमाऊली गटाने 20 जागा मिळवित एक हाती सत्ता मिळवली आहे. 

या निवडणुकीत गुरुकुल मंडळाचे एकमेव उमेदवार निवडून  आलेले आहेत. रोहकलेप्रणित गुरुमाऊली सदिच्छा मंडळाला आपले खातेही उघडता आलेले नाही. 

शिक्षक बँकेत एक हाती सत्ता असल्यामुळे आता तांबे गट कोणाला अध्यक्षपदाची संधी देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये कैलास सारोक्ते यांनी उपाध्यक्षपदासाठी यांनी अर्ज दाखल केला.  त्यांना सूचक म्हणून अण्णासाहेब आभाळे होते तर अनुमोदक म्हणून निरगुणा बांगर होत्या.

दोन्ही पदासाठी एक-एक अर्ज आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडी बिनविरोध जाहीर केल्या. यानिवडी होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post