निघोज : संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ संचलित संदीप पाटील गोरगरीब दिवाळी या सामाजिक उपक्रमासाठी घेण्यात आलेल्या निघोज येथील कपिलेश्वर मंगल कार्यालयात आठशे पेक्षा जास्त कुटुंबांना साडी व मिठाई बॉक्स वाटप करीत दिवाळीचा आनंद देण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ संचलित या कार्यक्रम लोकसहभागातून तब्बल दोन लाख रुपयांचा सहभाग देणगीच्या माध्यमातून मिळाला. तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी यामध्ये दोन लाख रुपये दिले.अशा प्रकारे चार लाख रुपयांची देणगी जमा करीत आठशे कुटुंबापर्यंत हा दिवाळीचा आनंद देण्याचा प्रयत्न करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाचे हे आठवे वर्ष असून गेली आठ वर्षांपूर्वी माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांनी हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली व सचिन पाटील वराळ यांच्या व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम सुरू आहे.
दिवाळीचा पाडवा ते दिवाळीच्या शेवटच्या दिवसापर्यंत वंचितांची दिवाळी साजरा करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असतो. कपिलेश्वर मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार अशोकराव निकम हे होते.
यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ,मुंबई बॅंकेचे अधिकारी सुनील पवार, नाशिकचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे,वडनेरचे सरपंच राहुल सुकाळे, शिक्षक सहकारी बॅंकेचे संचालक कारभारी बाबर, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार अशोकराव निकम, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त शिवाजीराव वराळ, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, उपसरपंच माऊली वरखडे, कपिलेश्वर मंगल कार्यालयाचे मालक सोमनाथ वरखडे, पत्रकार भास्करराव कवाद, ज्येष्ठ नेते शिवाजीराव डेरे, अर्जुन लामखडे, भिमराव लामखडे, बाबाजी तनपुरे, दत्तात्रय घोगरे, आंबेडकर स्मृती संघाचे सचिव बाबाजी वाघमारे, आदिंनी उपस्थीतांना मार्गदर्शन केले.
यावेळी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त भास्करराव वराळ, बजरंग वराळ, मनोहर राउत, गाडीलगावचे माजी सरपंच सुभाष गाडीलकर,वडनेरचे माजी सरपंच शिवा पवार,निघोज सोसायटीच्या संचालिका मनिषा वराळ, ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ, ग्रामपंचायत सदस्या शबनूर इनामदार,विलासराव हारदे, गजानन ठुबे,बाबा महाराज वराळ,संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे पदाधिकारी निलेश घोडे, रवि लंके, सुनिल वराळ पाटील,अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, ठेकेदार बाबाशेठ लंके, खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील युवा मंचचे तालुका प्रवक्ते प्रतीक वरखडे, आप्पा वराळ,रामा वराळ, आपला गणपती मंडळाचे अध्यक्ष रवी रणसिंग, सचिव रोहित पठारे , मेजर विकास वराळ, नाना वराळ, मुस्लिम समाजाचे शहराध्यक्ष रफिकभाई हवलदार, मोहन साळवे, सुनिल वराळ पाटील, रावसाहेब वराळ, शुभम लाळगे, श्रीकांत पवार, माजी सदस्या सुमन कवाद, मंळगंगा महिला बचत गटाच्या अध्यक्षा बॉबी गायखे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष ईधाटे, फिरोज शेख,रमीज शेख ,संतोष वराळ,आकाश वराळ,अक्षय वराळ, स्वप्नील वराळ, साजिदभाई तांबोळी, बशीरभाई मोमीन, समीर ढवळे,यश लोढा,महेश ठाणगे , प्रेस फोटोग्राफर जयसिंग हरेल,बार्टी समतादूत सुलतान सय्यद, इम्रान सय्यद, अमीर शेख,अल्फेज इनामदार,राहुल वराळ,हरेश ससाणे,राजू साबळे,भरत नाना शितोळे,सुनिल पंढरपूरे,गणेश हरेल,मंगेश कुंडलिक वराळ,गंगा वरखडे,गोपाळ वराळ,किसन नामदेव वराळ,शैलेश वराळ, आदी शेकडो कार्यकर्ते व देणगीदार व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल पवार यांनी केले शेवटी निलेश घोडे व अस्लमभाई इनामदार यांनी आभार मानले.
Post a Comment