शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर...

नगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत ३१ जुलै २०२२ ला घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ चा अंतरिम (तात्पुरता ) निकाल सात नोव्हेंबर २०२२ला सायंकाळी सहा वाजल्यापासून www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आलेला आहे. शाळा आपल्या विद्यार्थ्यांच्या निकाल त्यांच्या लॉग-इन मधून तसेच पालक आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहू शकतात.



विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉग-इन मध्ये सात ते १७ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, शहरी/ग्रामीण अभ्यासक्रम इत्यादी दुरुस्तीसाठी दि. १७  नोव्हेंबरपर्यंत संबंधित शाळेच्या लॉग-इन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

पूर्व उच्च प्राथमिक (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक (इ.८ वी) चा शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ चा अहमदनगर जिल्हयाचा निकाल अनुक्रमे २७.१९ व १३.२३ टक्के लागला आहे. शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ मध्ये पूर्व उच्च प्राथमिक (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) चा अनुक्रमे १५.७२ व ११.४३ निकाल होता. शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ च्या तुलनेत अनुक्रमे १२ टक्के व २ टक्के निकाल वाढलेला आहे.

अहमदनगर जिल्हयाचा राज्यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक (इ.८ वी) मध्ये अनुक्रमे ११ वा व १४ वा क्रमांक तसेच विद्यार्थी पात्र होण्यामध्ये महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे. 

पूर्व उच्च प्राथमिक (इ.५ वी) मध्ये २४ जिल्हा परिषद शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. जिल्हा परिषद शाळेतील पूर्व उच्च प्राथमिक (इ.५ वी) मध्ये २२० गुणांच्या पुढे ३५६ व पूर्व माध्यमिक (इ. ८ वी ) मध्ये १८० गुणांच्या पुढे १७ विद्यार्थी आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ च्या तयारीसाठी जिल्हास्तरावरुन ऑनलाईन व ऑफलाईन ११ सराव परीक्षा घेण्यात आल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी  दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post