अल्पवयीन मुलांनी केला एकाचा खून....

नगर : दोन अल्पवयीन मुलांनी चहाच्या टपरीवर काम करणार्‍या एका कामगाराचा खुन केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली. संजय छगन लिमगिरे (वय ४८ रा.नगर) या कामगाराचा खून झाला आहे.


संजय यांचा पुतण्या सतिष राजू लिमगिरे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भादविक ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

३० ऑक्टोबरच्या रात्री दोन अल्पवयीन मुलांनी दगडाने व लाकडी दांडक्याने संजय लिमगिरे यांना डोक्यात दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेले संजय लिमगिरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोघांवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हा खून संबंधितांनी का केला याचा तपास पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे एकच  खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का याचा पोलिस शोध घेत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post