बँकेच्या निवडीत नेवाशाला अध्यक्षपदाची संधी मिळेल का?..

नगर : मागील पंचवार्षिकमध्ये तांबे गटाने सर्वच तालुक्यांना अध्यक्षपदाची संधी दिलेली आहे. नेवासे तालुक्यातून रोहकले गटाचे संचालक असल्यामुळे नेवाशाला संधी मिळालेली नाही. 


मात्र या वेळी आता नेवाशातून तांबे गटाचे संचालक निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता तांबे नेवासा तालुक्याला अध्यक्षपदाची संधी देतील, अशी आशा सर्वांना लागलेली आहे. 

गुरुकुल मंडळाचे एकमेव संचालक अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अलिप्त राहतात की तांबे गटाला मतदान करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तांबे गटाकडून आता कोणाला अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची संधी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील पंचवार्षिकमध्ये सहा ते सात महिन्याला अध्यक्ष व उपाध्यक्ष बदले होते. तशी पध्दत या वेळी तांबे गटाने करू नये, अशी अपेक्षा सभासदांमधून व्यक्त केली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post