लाच घेताना दोन पोलिस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात...

पुणे  : चतु: शृंगी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात 25 हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई रविवारी (ता. 6)ला सायंकाळी करण्यात आली.


लाचखोर पोलिस कर्मचाऱ्यांची नावे रात्री उशीरापर्यंत समजू शकली नाही. चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ओैंध पोलिस चौकीत दोनही पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. दरम्यान, तक्रारदाराशी संबंधित एक प्रकरण चौकीत दाखल होते. या प्रकरणात संबंधित पोलिसांनी २५ हजारांची लाच मागितली होती. 


तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर रविवारी सायंकाळी सापळा लावून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना २५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले.  दोघांविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या घटनमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post