आपत्ती व्यवस्थापन या राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी राजेंद्र निमसे यांची निवड

नगर : आपत्ती  व्यवस्थापन युनिट महाराष्ट्र यांचे मार्फत शाळा सुरक्षा कार्यक्रमाची (स्कूल सेफ्टी प्रोग्राम ) अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने तीन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण १७ ते १९ नोव्हेंबर या दरम्यान कोथरूड , पुणे येथे आयोजित केले आहे. 


या प्रशिक्षणासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबळक येथील प्राथमिक शिक्षक व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यसंघटक तथा विकास मंडळाचे नूतन संचालक राजेंद्र निमसे यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्यातील ३४ जिल्ह्यांमधून आदर्श शाळेतील ( मॉडेल स्कूल ) प्रत्येक जिल्ह्यातून १० शिक्षक याप्रमाणे ३४० शिक्षकांना  राज्यस्तरीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे .  अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आदर्श शाळेतील  ३ जि प प्राथमिक , ४ माध्यमिक व ३ उच्च माध्यमिक शिक्षकांची निवड झाली आहे.

या प्रशिक्षणात प्रामुख्याने आपत्ती जोखीम व्यवस्थापनाच्या संकल्पना ,देश आणि राज्यातील शालेय सुरक्षिततेचा परिचय , शाळेच्या सुरक्षेची गरज , शाळा सुरक्षेसाठी जपान व न्यूझीलंड देशातील सर्वोत्तम पद्धती , शालेय आपत्ती व्यवस्थापन योजनेतील घटक ,शाळांशी संबंधित धोके आणि धोक्यांचे मूल्यांकन , भेद्यता आणि क्षमता मूल्यांकन ,शालेय आपत्ती व्यवस्थापनात पथकांची निर्मिती भूमिका आणि जबाबदाऱ्या , प्रतिबंध आणि शमन उपाय , प्रतिसाद आणि मदत , अग्निसुरक्षा - शोध आणि बचाव तंत्र , मॉकड्रिल आणि प्लॅन अपडेट साठी अपडेट फ्रेमवर्क , शाळेच्या आपत्तीचे पुनरावृत्ती करणे आदींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील , नगर तालुका गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव , विस्ताराधिकारी रामनाथ कराड ,केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी ,मुख्याध्यापक पोपट धामणे आदींनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post