आई-वडिलांची सेवा हिच खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा ....

निघोज : आई-वडिलांची सेवा हिच खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा असून प्रत्येक कुटुंबाने आई-वडील यांची सेवा करीत परमार्थ करण्याचे आवाहन विलास महाराज लोंढे यांनी केले आहे. 


येथील सिंधुबाई मारुती डावरे यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने डावरे कुटुंबांनी आनंदसिंधु वृद्धाश्रमाला पाच हजार रुपयांची देणगी दिली. यावेळी लोंढे महाराज उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. 

यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा वरखडे, अहमदनगर जिल्हा कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोकराव मंचरकर, पुणे जिल्हा कोष्टी समाज सेवा मंडळाचे पदाधिकारी राजेंद्र कथले, माजी सरपंच ठकाराम लंके,माजी उपसरपंच उमेश सोनवणे, अविनाश पंदारे, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त बबनराव ससाणे, निघोज सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठलराव वरखडे, निघोज सोसायटीचे संचालक दत्तात्रय लंके, बाळासाहेब महाराज वरखडे, खंडोबा देवस्थानचे मार्गदर्शक बाबाजी लंके,गवराम लंके, किसनराव लंके, पांडुरंग लंके, आबा लंके, शंकरराव लंके, खंडोबा देवस्थानचे सचिव सचिन लंके, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, सहाय्यक कामगार तलाठी सुनिल उचाळे, सतिष साळवे, बाळासाहेब डावरे,दिगंबर डावरे, सुमित्रा डावरे,दिगंबर डावरे, दिलीप उनवणे, नवनाथ लंके, रुपेश लंके,पारनेर तालुका फोटोग्राफर संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक संतोष पंदारे, सौरभ उनवणे, आपले गाव गणपती गणेश मंडळाचे अध्यक्ष रवि रणसिंग, सचिव रोहित दादा पठारे, मार्गदर्शक भास्कर सोनवणे,सर्व सदस्य,जय मल्हार मंडळाचे सदस्य, अल्पसंख्याक समाजाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

लोंढे महाराज म्हणाले डावरे कुटुंबाने आईची सेवा करताना समाजसेवी कामे करीत सेवाभाव करण्याचे काम केले आहे. आई वडीलांचे संस्कार व पुण्य या कुटुंबाला मिळाले असून एक संस्कारी कुटुंब म्हणून यातील सर्व सदस्य नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी पुणे, मुंबई, नगर, पारनेर, शिरूर येथील पंदारे, ढुमणे, शेवाळे, मंचरकर, ससाणे, उनवणे, राशिनकर, भागवत,खराडे, कथले, मंचरकर, बंगाळ, भिंगारकर हे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

गट महाराज यांचे यावेळी प्रवचन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडोबा देवस्थान ट्रस्टचे सचिव सचिन लंके यांनी केले. शेवटी पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post