नगर : नेप्ती उपबाजार समितीत गुरुवारी झालेल्या कांदा लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला १,८०० ते २,२०० प्रतिक्विंटल भाव मिळाला.
सध्या कांद्याचे भाव उतरले आहेत. साडेतीन हजार रुपयांपर्यंत गेलेले कांद्याचे भाव सध्या दोन हजारांवर आले आहेत. गुरुवारी लिलावासाठी ८७ हजार ४२३ गोण्या कांद्याची आवक झाली.
त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला १,८०० ते २,२००, द्वितीय प्रतवारीला १,२०० ते १,८००, तृतीय प्रतवारीला ७०० ते तर चतुर्थ प्रतवारीला २०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
Post a Comment