नगर : शहरातील एका अनाथालयात राहत असलेली तरूणी रागाच्या भारात शिर्डीला निघून गेली होती. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केला.
या तरूणीवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू होते. ती शुद्धीवर आल्यावर तिने दिलेल्या जबाबावरून सामुहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनाथालयात राहत असलेली तरूणी 14 जुलै 2022ला सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास निघून गेली. त्यानंतर ती शिर्डी मंदिर परिसरात एकटीच राहत होती. दिवाळीचे आगोदर रात्रीचे अनोळखी पाच मुले (रा. शिर्डी, ता राहाता) यांनी रात्रीचे वेळी जेवण देतो, असे सांगून त्याच्या रुमवर घेऊन गेले.
हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबला. पाच ही जणांनी तिच्यावर अत्याचार केला. या तरूणीवर जिल्हा शासकीय रूग्णालयात गेले तीन महिने उपचार सुरू होते.
ती शुद्धीवर आल्यावर तिने दिलेल्या जबाबावरून १६ ऑक्टोबरला एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच अनोळखी आरोपींच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पाठक पुढील तपास करीत आहेत.
Post a Comment