सांगली : शरद पवारांनी राज्यात अनेक घरे फोडली, त्यामुळे त्यांनी जे पेरलं तेच उगवत आहे. शरद पवारांच्या घरात उभी फूट पडण्याचे वातावरण तयार झाले आहे, असा आरोप भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केला आहे.
अडीच वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेची सूज आली होती. सत्ता गेल्यानंतर त्यांची सूज उतरली आहे. आता त्यांच्या पोटात दुखत आहे, असा टोला पडळकर यांनी लगावला. ते सांगलीमध्ये बोलत होते.
भारतीय जनता पार्टी विचाराने प्रेरित होऊन काम करते, म्हणून आमचा एकही आमदार फुटणार नाही. पवारांच्या घरात उभी फूट पडते का काय, असे वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आहे. तुम्ही राज्यातली एवढी घरे फोडली, एवढ्या लोकांना फोडले, त्यामुळे तुम्ही जे केले, तुम्ही जे पेरले, ते उगवणार आहे. हा भाजपचा आणि भाजपच्या विचारांचा विजय आहे, असे पडळकर म्हणाले.
Post a Comment