नेवासा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी कांद्याची 49 हजार 152 गोण्या आवक झाली. कांद्याला सर्वाधिक भाव 3100 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत निघाले.
एक-दोन लॉटला 2800 ते 3100 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 2500 ते 2800 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 2300 ते 2550 रुपये, गोल्टा कांद्याला 1400 ते 1800 रुपये, गोल्टी कांद्याला 1300 ते 1500 रुपये जोड कांद्याला 600 ते 900 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला 300 ते 800 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला.
कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाव चांगला साधत असला तरी शेतकर्यांनी एकाच वेळी कांदा विक्रीस नेऊ नये, असे शेतकर्यांमधून आवाहन करण्यात येत आहे.
Post a Comment