शहरातील नेतृत्वाचा "स्वयंभू" प्रवास डोईजड का?

 अमर छत्तीसे

श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात शहराची भुमिका महत्वाची असते सर्वच राजकीय पक्षाची गणिते शहरावर अवलंबून असतात मात्र शहराबाहेर राहुन शहरातील राजकारणावर पकड ठेवणाऱ्या नेत्यांना शहरातील नेतृत्वाचा "स्वयंभू" प्रवास डोईजड होतोय का असा सवाल उपस्थित होत आहे. 


श्रीगोंदा तालुक्याच्या विधानसभा सभेच्या राजकारणात शहराची भुमिका नेहमीच महत्वाची असते पण येथील स्थानिक नेतृत्व तालुक्याच्या राजकारणात डोकावु पाहु लागले सर्वच नेतेमंडळी एकत्र येऊन शहरातील नेतृत्वाचा हिरमोड करतात हा इतिहास शहराचा आहे. 

यापूर्वी जनतेमधुन नगराध्यक्ष झालेले नंदकुमार बोरुडे हे अशाच प्रकारे तालुक्याच्या राजकारणात डोकावु लागले कि त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा केला व आता मनोहर पोटे यांच्या रुपाने पुन्हा एकदा शहरवासीयांना प्रत्येय येत आहे. 


मागील काही दिवसांपासून नगराध्यक्षा सौ. शुभांगी पोटे यांचा तालुक्यातील कानाकोपर् यातील विविध कार्यक्रमांना असणारा सहभाग बरेच सांगुन जात आहे. मनोहर पोटे यांनीही खाजगीत आमदारकी लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा होती या सर्व बाबींचा प्रत्येय म्हणून तर अविश्वास नसेल ना? 

कारण मनोहर पोटे यांचे राजकारणात आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडून सुरू झाले एकेकाळी पाचपुते यांचे मानसपुत्र समजले जाणारे मनोहर पोटे हे गत पालिका निवडणुकीत पाचपुते यांचेशी फारकत घेऊन राजेंद्र नागवडे यांच्या हातात हात घालत नगराध्यक्ष झाले.

चार वर्षे चांगला कारभार चालु होता पण अचानक पोटे मोठे भ्रष्टाचारी झाल्याचा साक्षात्कार नेमका कसा झाला  हे न उलगडणारे कोढे आहे. शहरातील सर्वच पक्षांनी शहरातील नेतृत्वाला फक्त पालिकेपुरते मर्यादित ठेवले या शहरातून अनेक मात्तबर नेते घडले पण तालुक्याच्या राजकारणात एखाद दुसरा अपवाद वगळता तालुक्याच्या राजकारणात कोणाचाच ठसा उमटलेला नाही.

एकंदरीत शहरातील नेतृत्वाचा "स्वयंभू" प्रवास हा डोईजड तर होत नाही ना असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.गेली चार वर्षे सर्वच नगरसेवकांना मनोहर पोटे हे हवेहवेसे वाटत असणारे मनोहर पोटे शेवटच्या वर्षात सर्वांनाच नकोसे का झाले  हे न उलगडणारे कोढे आहे.

नगराध्यक्ष शुभांगी पोटे व त्यांचे पती नगरसेवक मनोहर पोटे यांना हटविण्यासाठी मुंबई. नगर उत्तरेतून फिल्डिंग लावली असल्याची चर्चा आहे पण याच अद्रुष्य शक्ती शहरातील विकासासाठी हात देणार का असा सवाल सर्वसामान्यांमधुन उपस्थित होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post