नवी दिल्ली : बारावीच्या विद्य़ार्थीनीवर अॅसिड फेकल्याची घटना दिल्लीत घडली आहे. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. दिल्लीतील द्वारका मोड भागातील ही घटना आहे. मुलगा व मुलगी यांची परस्पर ओळख होती असे सांगितले जात आहे. मुलगी बारावीची विद्यार्थिनी आहे.
या घटनेनंतर दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीला सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की पीडितेला रुग्णालयात चांगल्या वैद्यकीय सुविधा दिल्या जात आहेत. मात्र, मुलीवर अॅसिड फेकण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Post a Comment