नाशिक ः नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी डॉ. प्राची पवार यांच्यावर अज्ञातांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात प्राची पवार गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.
डॉ. प्राची पवार ह्या मविप्र संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत पवार यांच्या कन्या आहेत. प्राची पवार या मंगळवारी रात्री गोवर्धन शिवारात असलेल्या आपल्या फार्म हाऊसमध्ये गेल्या होत्या. यावेळी हल्लेखोरांपैकी दोघेजण फार्म हाऊसलगतच्या झाडीत लपून बसले होते.
प्राची पवार या दुचाकीवरून फार्म हाऊसजवळ आल्या असता, त्यांनी या दोघांना हटकले. तेव्हा, हल्लेखोरांनी अचानक धारदार शस्त्राने प्राची यांच्या हल्ला केला.
त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरु केलं आहे.
Post a Comment