नवी दिल्ली ः पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते. 5 डिसेंबरला हा नवीन
दर लागू होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून इंधन दर कमी होण्याच्या
प्रतिक्षेत वाहनधारक आहेत.
पाच डिसेंबरला पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 5 रुपयांपर्यंत कपात होण्याचा दावा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी ही असे दावे करण्यात आले आहेत. पण तज्ज्ञांच्या मते, गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारकडून हे गिफ्ट मिळू शकते.
देशात सध्या क्रुड ऑईलच्या किंमती $90 प्रति बॅरलवर व्यापार करत आहेत.
सध्या या किंमती $82 च्या जवळपास आहेत. नोव्हेंबर महिन्यात क्रूड ऑईलच्या
किंमतीत 7 टक्के घसरण दिसून आली. त्यामुळे जनतेतही पेट्रोल-डिझेलचे दर कमी
होण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आता किती दर खाली येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Post a Comment