कॉपी शॉप बनले अश्लील चाळ्यांचे अड्डे... पोलिसांची कारवाई...

कर्जत : कर्जत शहरातील चार कॉफी शॉपवर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तब्बल चार कॉफी शॉपवर कारवाई करण्यात आली आहे.


तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यास तसेच अश्लील कृत्ये करण्यास सुलभता मिळावी यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून देऊन त्या बदल्यात तासाप्रमाणे पैसे घेणाऱ्या कर्जत शहरातील चार कॉफी शॉपवर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आक्रमक भूमिका घेतली असून तब्बल चार कॉफी शॉपवर कारवाई करण्यात आली आहे.

कर्जत शहरातील काळदाते कॉम्प्लेक्स येथील कॉफी अन् बरचं काही, मुनलाईट, फ्रेंडशिप, द कॉफी पॉईंट अशी कारवाई करण्यात आलेल्या कॉफीशॉपची नावे आहेत. कॉफी शॉपवर मुला-मुलींना, तरुण-तरुणींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते. 

तसेच कॉफीशॉपमध्ये बसून ज्यादा पैसे देऊन अनेक चुकीच्या गोष्टी करण्यात येतात, अशी तक्रार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यासाठी पोलिसांनी कायम स्वरुपी अशा ठिकाणांवर छापे टाकणे गरजेचे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post