नागपूर : अधिवेशनाच्या पुर्व संधेला सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षनेत्यांना चहापानाचे आमंत्रण दिले होते. ज्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल खुलासा केला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंधेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. ज्यामध्ये त्यांनी अधिवेशनासह अनेक विषयांवर संवाद साधला.
पवार यांनी आम्ही अधिवेशनाआधी बैठक घेतली. मात्र राज्यात ग्रामपंचायत निवडणुका असल्याने अनेक नेते उपस्थित नव्हते, असा खुलासा केला.
पवार म्हणाले की, एकनाथराव शिंदे यांनी विरोधकांना चहापानाला बोलवले होते. पण आम्ही चर्चा केली. सहा महिने सत्तेत आलेले हे सरकार अपेक्षा पूर्ण करु शकले नाही. सरकारमधील नेत्यांकडून महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणे सुरूच आहे.
राज्यातील प्रकल्प गुजरातला गेले. सीमाप्रश्न, शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नाही. या सर्वांवर आम्ही विचार केला व चहापानावर बहिष्कार टाकला आहे.
Post a Comment