नगर : भिंगारमधील विद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय तरूणाने हिंदू जनआक्रोश मोर्चाचा फोटो व्हॉटअप स्टेटसला ठेवल्याच्या कारणातून मारहाण केल्याची घटना घडली.
गुरूवारी (ता.१५) सकाळी घडली आहे. या तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिंगारमधील एका विद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना गुरूवारी सकाळी काही विद्यार्थ्यांनी त्याला छेडले. त्याने जाब विचारला असता त्यांनी त्या तरूणाला तू बाहेर ये दाखवतो, असा दम दिला. यानंतर तो विद्यालयाच्या बाहेर आल्यानंतर हिंदू जनआक्रोश मोर्चाचे फोटो स्टेटसला का ठेवला, असे म्हणून मारहाण केली.
मोबाईलवर अशा स्वरूपाचे फोटो किंवा स्टेटस ठेवले, तर जीवे मारण्याची धमकी दिली. या तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अमन शेख, रेहान, अत्तर, फैजल (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. आलमगीर, भिंगार) यांचाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment