नगर : आमच्या मागे शिवीगाळ का करतो,असे म्हणून संजय शेंडगेसह चौघांनी एका तरूणास मारहाण केली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश सुभाष गायकवाड (वय ४३, रा. बागरोजा हाडको, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण बुधवारी (ता.१४) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बागरोजा हाडको येथे असताना आरोपी संजय शेंडगे, संदीप, अनिकेत असे चौघे तेथे आले. आमच्या मागे आम्हाला शिव्या का देतो, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात चौघांविरूद्ध मारहाण करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment