श्रीगोंदा : तालुक्यातील घुमरे वस्ती जंगलेवाडी येथील रहिवासी असलेले वामन पाटील व घुमरे (वय ९०) यांच्यावर स्वतःच्या जावई व मुलीने किरकोळ कारणावरून हल्ला केला.
मात्र ही भांडणं सोडवण्यासाठी मध्यस्थी गेलेल्या इसमाच्या डोक्यात जबरी मार लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी जावई आबा झुंबर जंगले (रा. जंगलेवाडी) व त्यांची पत्नी सविता आबा जंगले यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
१४ डिसेंबरला दुपारच्या सुमारास वामन घुमरे यांची नात गौतमी ही घुमरे यांच्या घरासमोर असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी आली होती मंदिराला कुलूप होते. म्हणून गौतमीने आजोबांना विचारले कुलूप का लावले. त्यावेळी येथून भांडी पुस्तके चोरीला जातात. म्हणून मंदिराला कुलूप लावले आहे, असे वामन घुमरे यांनी गौतमीला सांगितले.
तुला चावी लागत असेल तर चावी घरामध्ये आहे चावी घेऊन पंधरा वीस मिनिटे गौतमी मंदिरात बसली पुन्हा वामन घुमरे यांच्यापाशी जाऊन तुम्ही मुद्दाम मला वस्तू चोरीला गेल्याचे सांगतात मी काय चोर आहे का? मी आल्यामुळे तुम्ही मला असे म्हणतात असे गौतमी म्हणाली आजोबा वामन घुमरे यांनी किती समजत काढली होती.
तिथून निघून गेली. दुपारी चार वाजण्याची सुमारास वामन घुमरे यांची मुलगी व जावई हे वामन घुमरे यांना शिवीगाळ करायला लागले अंगावर धावून आले त्यावेळी वामन घुमरे यांचा सेवेकरी विठ्ठल मल्हारी टेंगले वय वर्ष 37 राहणार जंगलेवाडी श्रीगोंदा हे घुमरे यांना वाचवण्यासाठी मध्ये आले असता जावई आबा झुंबर जंगले यांनी तेथे पडलेले वीट टेंगले यांच्या डोक्यात मारून त्यांना दुखापत केली तेथे पडला उचलून वामन घुमरे यांच्या पाठीत मारला धक्काबुक्की मध्ये वामन घुमरे हे विटांच्या ढिगार्यावर पडले.
त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.घटनास्थळी असलेले ज्ञानदेव लाळगे मंगल डेंगळे विश्रांती करणार यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी काही येत नाही वामन घुमरे यांचा सेवेकडी विठ्ठल टेंगळे हार्दिक शुद्ध अवस्थेत पडलेला पाहून मग ते दोघेजण तिथून निघून गेले निघून गेले जाताना त्यांनी जीव मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर वामन घुमरे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये भादवि कलम 224 323 504 506 व 34 नुसार गुन्ह्यांची नोंद केली आहे.
Post a Comment